बेंगळूर
हवाई उद्योगात कार्यरत असणारी गो एअर ही कंपनी भारतीय भांडवली बाजारात आपला आयपीओ आणण्याचा विचार करते आहे. या आयपीओतून कंपनीने 3 हजार 600 कोटी उभारण्याचे निश्चित केले आहे. वाडिया ग्रुपची असणारी ही कंपनी परवडणाऱया दरात ग्राहकांना विमान सेवेचा लाभ मिळवून देते. इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ)करीता कंपनीने अलीकडेच सेबीकडे रीतसर अर्ज केला आहे. अर्ज मंजुर होताच कंपनी आयपीओ दाखल करण्याबाबतची तारीख स्पष्ट करणार आहे. आपल्या व्यवसायाच्या विस्तारासाठी सदरची उभारलेली रक्कम खर्चली जाणार आहे.