काकती पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी / बेळगाव
गौंडवाड (ता. बेळगाव) येथील एक तरुणी गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. यासंबंधी तिच्या वडिलांनी गुरुवारी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
मधुमती कल्लाप्पा कुरणे (वय 19, रा. बसवाण्णा गल्ली, गौंडवाड) असे या तरुणीचे नाव आहे. 5.2 फूट उंची, अंगाने साधारण, गोल चेहरा, लालसर रंग असे तिचे वर्णन आहे. घराबाहेर पडताना या तरुणीने राखाडी पंजामी पॅन्ट व लाल टिशर्ट परिधान केले होते.
3 जानेवारी 2020 रोजी सकाळी 8 ते रात्री 8 यावेळेत ती बेपत्ता झाली आहे. काकती पोलीस स्थानकात या संबंधी एफआयआर दाखल करण्यात आले असून वरील वर्णनाच्या तरुणी विषयी कोणाला माहिती मिळाल्यास 0831-2405203 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.