ऑनलाईन टीम / हाँगकाँग :
हाँगकाँगमध्ये चीनने नुकताच राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला आहे. या कायद्याला धोका पोहचवू शकतील, अशी सर्व पुस्तके शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठातील ग्रंथालयातून हटवण्याचे आदेश हाँगकाँग प्रशासनाने दिले आहेत.
राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार स्वातंत्र्याची मागणी करणारे राजकीय विचाराचे पुस्तक आता अनधिकृत असणार आहेत. आतापर्यंत चीनने याबाबतची माहिती लपवली होती. मात्र, आता या कायद्यामध्ये काय आहे हे समोर येऊ लागले आहे.
चीनने शिक्षण राष्ट्रवादी असायला हवे, अशी सक्ती केली आहे. त्यानुसार शाळा प्रशासनाने आणि शिक्षकांनी आपला अभ्यास आणि शिकवणी बदलून घ्यावी, असेही आदेश देण्यात आले आहेत. हाँगकाँगमध्ये आशियातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठे आहेत. मात्र, या विद्यापीठांना आपला अभ्यास आता संकुचित करावा लागणार आहे.