दोडामार्ग /वार्ताहर-
दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाच्या नूतनीकरण सुशोभीकरण कामाअंतर्गत संरक्षक भिंत उभारण्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा सनसनाटी आरोप शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केला आहे. तब्बल 39 लाख रुपये अंदाजपत्रक असलेल्या या कामाचे बिल काम पूर्ण न करताच अधिकारी व ठेकेदार यांनी त्यातील 34 लाखांचे बिल खर्ची घातले आहे, असे धुरी यांनी सांगितले.