दोडामार्ग /वार्ताहर –
कळणे मायनिंग मधील पाण्याचा बंधारा फुटून झालेल्या जलप्रलयात कळणे – उगाडे रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास येत्या 15 ऑगस्ट रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा उगाडे येथील सूर्या गवस यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी बांधकाम विभागाला एक निवेदनही दिले आहे.