तपासनाके खुले : कर्मचारी जबाबदारीमुक्त
प्रतिनिधी /बेळगाव
संभाव्य कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाने आता मोठय़ा प्रमाणात पावले उचलली होती. त्यामुळे केरळ व महाराष्ट्रातून येणाऱया मार्गांवर चेकपोस्ट उभारण्यात आले होते. मात्र संभाव्य तिसऱया लाटेचा प्रभाव कमी झाल्याने आता सर्व नाक्मयांवरील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे नाक्मयांवर असणाऱया ग्राम पंचायत कर्मचाऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
परराज्यातून बेळगावात येणाऱयांची कसून चौकशी करण्यात येत होती. चेकपोस्टवर ग्राम विकास अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना स्वतः तेथे जाणे अनिवार्य होते. मात्र काही ग्राम विकास अधिकारी ही जबाबदारी आपल्या क्लार्क व सेपेटरींवर सोपवून निवांत असल्याचे प्रकार आढळून आल्याने त्यांना तंबी देण्यात आली होती. त्यामुळे ग्राम पंचायत पीडीओ व कर्मचाऱयांना चेकपोस्टवर थांबणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना अतिरिक्त कामाचा ताण पडला होता.
पीडीओंना चेकपोस्टवरील जबाबदारी ही प्रामुख्याने करावीच लागणार असा आदेश सरकारने दिला होता. त्यामुळे त्यांना ग्राम पंचायतींच्या इतर कामांबरोबरच चेकपोस्टवरही कामासाठी थांबावे लागत होते. काही पीडीओंनी इतर कर्मचाऱयांवर आपला कामाचा भार सोपवत असल्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यानंतर तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर यांनी तंबी देऊन चेकपोस्टवर थांबणे हे अनिवार्य असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पीडीओंवर अधिक कामाचा ताण पडला होता.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना आणि बाहेरील राज्यातून येणाऱयांची कसून तपासणी सुरू केली होती. बेळगावशी संपर्क असलेल्या शिनोळी, बेकिनकेरे, चलवेनहट्टी, केदनूर, हंदिगनूर, राकसकोप आदी भागात पोलीस नजर ठेवून होते. अशा अनेक चेकपोस्टची पीडीओंवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यामुळे त्यांची चांगलीच गोची झाली होती.
निर्बंध हटविल्याने समाधान
चेकपोस्टवर पीडीओंबरोबरच सेपेटरी, क्लार्क व इतर कर्मचाऱयांनाही सेवा देणे बंधनकारक होते. तीन शिप्टमध्ये ही सेवा करण्याचे सरकारने आदेशात म्हटले होते. सकाळी 8 ते दुपारी 3, दुपारी 3 ते रात्री 10 व रात्री 10 ते सकाळी 8 अशा शिप्टमध्ये ही सेवा बजावण्याचे सांगितले होते. त्यामुळे अनेक पीडीओंना याचा मोठा त्रास सहन करावा लागला होता. आता सरकारने चेकपोस्टवरील निर्बंध हटविल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.