वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑनलाईन रिटेलर पेटीएम मॉल ई-ग्रोसर कंपनी ग्रोफर्समधील मोठी हिस्सेदारी खरेदी करण्याच्या तयारीत आहे. या व्यतिरिक्त दोन्ही कंपन्यांची भागीदारी होण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. जपानचा गुंतवणूक समूह सॉफ्ट बँकची दोन्ही कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक आहे. सध्या दोन्ही बाजूनी सॉफ्टबँकच चर्चा करत आहे.
दोन्ही कंपन्या व्यवहारानंतर कोणतेही काम एकत्र करणार आहेत. पेटीएम मॉलकडे जवळपास 12 हजार कोटी रुपये रोख आहे. याच्या जोरावरच ग्रॉसरी (किराणा) बाजारात पाय ठेवण्याची तयारी करत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे देशात लॉकडाऊन सुरु आहे.
पेटीएममधील हिस्सेदारी
एसबीजीची पेटीएममध्ये जवळपास 20 टक्के हिस्सेदारी आहे. चीनमधील आणखीन एक गुंतवणूक कंपनी अलिबाबाच्या सॅफ पार्टनर्ससोबत मिळून पेटीएम मॉलमध्ये जवळपास 35 टक्के हिस्सेदारी आहे.