सेबीची मान्यता : आयपीओ पुढील महिन्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
शांघाय फोसन फार्माची मोठी हिस्सेदारी असणाऱया ग्लँड फार्माच्या आयपीओला (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) सेबीने मंजुरी दिली आहे. याच्या आधारे कंपनी 6 हजार कोटी रुपये उभारणार आहे. सदरचा आयपीओ सादर झाल्यास चीनची सर्वाधिक हिस्सेदारी असणाऱया कंपनीचा पहिलाच आयपीओ ठरणार असून तो पुढील महिन्यात येणार आहे.
औषध निर्मितीमध्ये कार्यरत
ग्लँड फार्मा ही औषध निर्मितीत कार्यरत आहे. ही कंपनी इंजेक्टेबल औषधांची निर्मिती करते. कोरोना कालावधीत हा सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे. सेबीने मंजुरीच्या वेळी म्हटले आहे, की भारतामध्ये फार्मा क्षेत्रात जोरदार तेजी येत असून भारत आणि चीनमध्ये सुरु असणारा तणाव हा विकोपाला जात आहे. यामुळे या काळात होणारा बदल हा महत्वपूर्ण ठरत असल्याचे म्हटले जात आहे.
औषध कंपनीचा पहिला आयपीओ
आयपीओ लाँच करत असताना चालू वर्षात आतापर्यंत बाजारात कोणतीही नवीन औषध कंपनी लिस्टिंग झालेली नाही. याचाच अर्थ कोणत्याही औषध क्षेत्रातील कंपनीचा आयपीओ सादर झाला नव्हता. औषध कंपनीचा शेवटचा आयपीओ हा 2017 मध्ये आला होता अशी माहिती आहे. तेव्हा एरिस लाइफसायनसेसने आपला आयपीओ आणला होता.