प्रतिनिधी / खेड :
तालुक्यात आढळणाऱया कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयात कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. सद्यस्थितीत येथे 50 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. या कोरोनाबाधितांना देण्यात येणाऱया नाष्टय़ात गुरूवारी सकाळी चक्क झुरळ आढळल्याने प्रशासनाचा गलथानपणाच पुढे आला आहे.
यापूर्वी कोरोनाबाधितांवर कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाबाधितांची संख्याही वाढत चालल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला होता. कोरोनाबाधितांची प्रकृती गंभीर बनल्यास उपचारासाठी रत्नागिरी येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात येत होते. या साऱया प्रक्रियेस होणाऱया विलंबामुळे रूग्ण दगावण्याची शक्यता सर्वाधिक होती. या पार्श्वभूमीवर दीड महिन्यापूर्वी लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयात कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली. यामुळे कोरोनाबाधितांवर तातडीने उपचार करणे सुलभ झाले होते. मात्र, येथे उपचार घेणाऱया कोरोनाबाधितांना देण्यात येणाऱया नाष्टय़ात झुरळ आढळल्याचा प्रकार गुरूवारी सकाळी उघड झाल्याने सारेच चक्रावले आहेत. नाष्टय़ात झुरळ असल्याचे कोरोनाबाधितांच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने ही बाब संबंधितांच्या कानावर घातली.
या कोविड सेंटरमध्ये 50 कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत असून 4 तापाचे रूग्ण आहेत. मात्र, नाष्टय़ात झुरळ आढळल्यानंतर साऱयाच रूग्णांनी नाष्टा न खाणेच पसंत केले. या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन संबंधितांवर कोणती कारवाई करते, याकडेच साऱयांचे लक्ष लागले आहे.