जमिनीच्या वादातून घडला प्रकार
प्रतिनिधी/ बेळगाव
जमिनीच्या वादातून घुग्रेनट्टी येथे काही जणांनी जबर मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. मारुती बाबू जाधव (वय 32) असे त्याचे नाव असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत.
मारुती बाबू जाधव आणि विठ्ठल देसूरकर यांच्यामध्ये पहिल्यापासूनच वाद आहे. वारंवार आम्हाला नाहक त्रास तसेच धमकी देत असल्याचा आरोप मारुती बाबू जाधव यांनी केला आहे. त्याच्या डोक्मयाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. आम्हाला नाहक त्रास देत असले तरी पोलीस त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाहीत, असे देखील त्याने यावेळी सांगितले.