आज छानणी : सोमवारी अर्ज माघारीचा दिवस
वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
येत्या 22 डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील होणाऱया ग्राम पंचायत निवडणुकीसाठी कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायतीमध्ये 13 वार्डातील 34 जागांकरिता जवळ जवळ 133 इच्छूक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शनिवार दि. 12 रोजी अर्जाची छानणी होणार आहे. तर सोमवार दि. 14 रोजी अर्ज मागे घ्यावयाचा दिवस आहे. यानंतरच किती उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तसेच निवडणुकीची खरी चुरस समजणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायत कार्यक्षेत्रामध्ये गौंडवाड मिळून एकूण 13 वार्ड आहेत. या तेरा वार्डातील 34 जागांसाठी 196 अर्ज वितरण केल्याचे निवडणूक मुख्य अधिकारी आर. जी. मेळबंकी यांनी ‘तरुण भारत’ शी बोलताना सांगितले.
105 नवीन चेहरे निवडणूक रिंगणात
13 वार्डातील 34 जागांसाठी जवळ जवळ 105 नवीन चेहऱयांनी निवडणूक लढविण्यासाठी निवणुकीत उतरले आहेत. परंतु या सर्वांचे पारडे जड किंवा हलके करणे हे मतदारांच्या हातात आहे. यामुळे गुरुवार दि. 16 ते 20 पर्यंत उमदेवारांना निवडणूक प्रचाराला वेळ मिळणार आहे व त्यांनी मतदारांच्या गाठीभेठी घेऊन आपले नशीब आजमावयाचे आहे. एकूण मतदार राजावरवरील सर्वांचे राजकरणातील भवितव्य अवलंबून असल्यामुळे मतदारांचा कौल कुणावर आपल्या किंमती मतांचा आशिर्वाद देणार असेही चित्र दिसून येत आहे.
जुने 28 मजी सदस्य रिंगणात
ग्राम पंचायतीमध्ये परत निवडून येऊन सेवा करण्याच्या उद्देशाने जवळ जवळ 28 माजी सदस्यांनी परत निवडणूक रिंगणात अर्ज भरले आहेत. एकूण सदस्य संख्या 34 आहे. यापैकी 28 सदस्यांनी परत आपले नशीब आजमावण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत.