ऑनलाइन टीम / मुंबई :
आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ आणि एमडी चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबियांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मोठा दणका दिला आहे. ईडीने चंदा कोचर यांचा मुंबई स्थित फ्लॅट जप्त केला आहे. त्यांच्या पतीची 78 कोटी रुपयांची मालमत्ता देखील जप्त केली आहे.
चंदा कोचर कोचर यांच्याविरूद्ध ही कारवाई 2012 मध्ये आयसीआयसीआय बँकेच्या 3250 कोटींच्या कर्ज प्रकरणात करण्यात आली आहे.
कर्ज देताना गैरव्यवहार केल्याचा आरोप झाल्यानंतर चंदा कोचर यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये राजीनामा दिला होता. अलीकडेच त्यांनी आपल्याविरूद्ध बँकेने काढून टाकण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.