अथणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, ग्राहकांना मिळणार अने बक्षिसांचा लाभ
बेळगाव /
गेली 193 वर्षे शुद्धता, परंपरा आणि विश्वास या त्रिसुत्रीच्या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स् प्रा. लि. च्या 20 व्या अथणी सुवर्ण दालनाचा शुभारंभ शनिवार दि. 15 ऑगस्ट रोजी आमदार महेश कुमाथल्ली यांच्या शुभहस्ते व कर्नाटक जैन असोसिएशनचे उपाध्यक्ष ए. सी. पाटील, नांदगावचे नेते किरण पाटील, असि. एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर अरुण यलगुद्री, दत्तात्रय वास्तर, शशिकांत पाटील व चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स्चे संचालक सिद्धार्थ अतुलकुमार शहा व अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी चंदुकाका सराफ ऍन्ड सन्सच्यावतीने सिद्धार्थ शहा यांनी मान्यवरांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. उद्घाटनापासूनच अथणीकरांनी मोठा प्रतिसाद दिला होता. यावेळी अथणीकर नागरिक, विविध सामाजिक, अर्थिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार महेश कुमाथल्ली म्हणाले की, चंदुकाका सराफ यांनी अथणीकरांना साजेसे असे सुवर्ण दालन साकारले आहे. चंदुकाका सराफ यांनी पिढय़ान पिढय़ांनी कमावलेला विश्वास व सचोटी यामुळे नावलौकीक कमावला आहे. चंदुकाका सराफ व अथणीकर यांचे अतुट नाते येत्या काळात निर्माण होईल, अशी माझी खात्री असल्याचे आमदार महेश कुमाथल्ली यांनी सांगितले. यावेळी श्री. सिद्धार्थ शहा संचालक, चंदुकाका सराफ यांनी सांगितले की, चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स् प्रा. लि. यांचा एका दुकानापासून सुरु झालेला प्रवास आता आणखी 8 शहरं व 20 दिमाखदार सुवर्ण दालनांपर्यंत पोहोचला आहे. समृद्ध आणि सुजलाम-सुफलाम अथणी शहरात पदार्पण करताना आमचा आनंद द्विगुणीत होत असून समस्त अथणीकरांचे व आमचे अतुट नाते निर्माण होईल, उद्घाटनानिमित्त चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स या सुवर्ण पेढीने अत्यंत जबरदस्त ऑफर्स जाहीर केल्या असून ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. विशेष म्हणज रु. 9 हजार 900 व त्या पुढील खरेदीवर दि. 31 ऑगस्टपर्यंत 40 इंची एक एलईडी टिव्ही, 5 व्लूटुथ स्पिकर्स , 5 स्मार्ट फोन्स ज्ंिांकण्याची सुवर्णसंधी चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स यांनी उपलब्ध केली आहे. याचबरोबर कल्पतरु या सुवर्णसंचय योजनेमध्ये सहभागी होणाऱया एका भाग्यवान ग्राहकाला एक एलईडी टिव्ही मिळण्याची संधी आहे.