प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडे येथील जन उत्कर्ष शिक्षणसंस्था संचालित चंद्रभागा तुकोबा नाईक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पालक-शिक्षक संघाची बैठक नुकतीच कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करून झाली. यावेळी प्रभारी प्राचार्य श्रीपाद भट, शिक्षिका सुगंधा भट व इतर सदस्य उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच 2021 ते 2023 या पुढील दोन वर्षांसाठी नवीन समितीची निवड करण्यात आली. त्यात अध्यक्ष म्हणून किशोर गावस देसाई, तर उपाध्यक्ष म्हणून प्रवीण नाईक यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सचिव प्रदीप नाईक, खजिनदार चंदेश गोसालिया, सदस्य देवानंद नाईक, जयंत नाईक याची निवड झाली आहे. सुरुवातीला सुगंधा भट यांनी मागील वर्षाचा वृत्तांत सादर केला. प्रदीप नाईक यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सुगंधा भट यांनी केले.