हॉटेल-स्पाकडून ग्राहकांना स्वतःची स्लिपर्स आणण्याची विनंती
अनेकदा वस्तूंचा पुरवठा कमी झाल्यावर त्याची मागणी वाढत जाते. सध्या ब्रिटनमध्ये अशी कमतरता दिसून येत आहे. ब्रिटनमध्ये सध्या चप्पलांची (स्लिपर) कमतरता जाणवत आहे. अशा स्थितीत हॉटेल आणि स्पा यांनाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांनाही यामुळे समस्या होतेय.
ब्रिटनमध्ये राष्ट्रीय पातळीवर चप्पलांची कमतरता जाणवू लागली आहे. स्लिपर्सच्या कमतरतेमुळे लोक हॉटेल आणि स्पाकडून ग्राहकांना चप्पल्स उपलब्ध करविणे थांबविण्यात आले आहे. स्वतःसोबत चप्पल घेऊन या अशी विनंती आता या हॉटेल्स आणि स्पाकडून ग्राहकांना करण्यात येत आहे.
ट्रिप ऍडव्हायजरवर लोकांनी आपल्याला घरातून चप्पला आणण्यास सांगितले जात असल्याचे नमूद केले आहे. एसेक्सच्या ग्रीनवुड्स हॉटेल आणि स्पामध्ये एका व्यक्तीने बुकिंग केले होते. या व्यक्तीला अचानक हॉटेलकडून मेल पाठवत नॅशनल स्लिपर्सच्या तुटवडय़ामुळे लोकांनी घरातून चप्पल आणणे आवश्यक असल्याचे कळविण्यात आले.
कमतरता कशामुळे
ब्रिटनमध्ये चप्पलच नव्हे तर अन्य गोष्टींचीही कमतरता जाणवू लागली आहे. कोरोना महामारीदरम्यान अवजड वाहन चालविणाऱया चालकांच्या संख्येत मोठी घट झाल्याने पुरवठासाखळीला नुकसान पोहोचले आहे. हॉटेल आणि मोठे उद्योग अशा गोष्टींना घाऊक स्वरुपात खरेदी करत होते. परंतु पुरवठाच विस्कळीत झाल्याने त्यांच्याकडे सामग्रीची कमतरता निर्माण झाली आहे. अनेक हॉटेल्समध्ये शॅम्पू, टॉवेल्स इत्यादींचीही कमतरता दिसून येत आहे.