वार्ताहर / उचगाव
चलवेनहट्टी येथे शिवजयंतीनिमित्त पोवाडय़ाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चलवेनहट्टी तसेच ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवजन्म तसेच प्रतापगडचा रणसंग्राम सादर करून शाहीर व्यंकटेश देवगेकर यांनी अंगावर रोमांच उभे केले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन वासुदेव पाटील, निवृत्त सैनिक यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, तर लता मंगेशकर, एन. डी. पाटील यांच्यासह गावातील निधन झालेल्या व्यक्तींना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. गजानन पाटील या युवकाने मनोगत व्यक्त केले. तर भक्तेश पाटील यांच्या हस्ते शाहीर व्यंकटेश देवगेकर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गणेशोत्सवाचे अध्यक्ष दीपक बडवाणाचे तसेच उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते शाहीर सहकारी यांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. नितेश नाथबुवा यांनी प्रास्ताविक केले, तर भारत हुंदरे यांनी आभार मानले.
यावेळी लक्ष्मण बडवाणाचे, अनिल पाटील, भूषण पाटील, मनोहर हुंदरे, परशराम रेडेकर, कनोज बडवाणाचे, प्रतीक पाटील, युवराज पाटील, परशराम पाटील, राहुल रेडेकर, परशराम बडवाणाचे, किरण म. पाटील, अमृत रेडेकर, नितेश अमर नाथबुवा, सुरज पाटील, किरण पाटील, अतिश पाटील, सुशांत पाटील, लक्ष्मण बडवाणाचे, महेश हुंदरे, सौरभ बडवाणाचे, दयानंद हुंदरे, मल्लाप्पा बडवाणाचे, संजय बडवाणाचे, आकाश बडवाणाचे, मारुती पाटील, सुरज बा. पाटील, भरमा पाटील, सुशांत पाटील, मंथन बडवाणाचे, विलास पाटील, सचिन पाटील, प्रकाश बडवाणाचे, सचिन किटवाडकर, उमेश पाटील, गुंडू पाटील आदी उपस्थित होते.