प्रतिनिधी / बेळगाव
इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडियाच्या बेळगाव चार्टर्ड अकौंटंट्स शाखेला लघु शाखा विभागात दुस्टय़ा क्रमांकाची उत्कृष्ट शाखा म्हणून गौरविण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे नुकतीच विविध शाखांची गुणवत्ता श्रेणी जाहीर करण्यात आली. त्यात बेळगाव शाखेलाही बहुमान मिळाला आहे.
अरुण सिंग तसेच चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुलकुमार गुप्ता यांच्या हस्ते 71 व्या वर्धापन दिनात हा पुरस्कार सतीश मेहता यांनी स्वीकारला. शाखेने नागरिकांना विविध स्वरुपात उत्तम सेवा दिलेली आहे. कोरोना काळात अनेक गरजूंपर्यंत रेशन किट, मास्क, सॅनिटायझर, अन्नधान्य पोहचण्याची व्यवस्था केली. तर पंतप्रधान साहाय्यता निधीला 8 लाख रुपये दिले. याच दरम्यान संस्थेने ऑनलाईन वेबिनारही घेतले. ज्याचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ झाला. महिलांसाठी अभिनव पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आला. याशिवाय अर्थसंकल्प पूर्व आणि अर्थसंकल्पानंतर मंत्र्यांना निवेदन पाठवून देण्यात आले आहे. शहर परिसरात 20 हून अधिक शाळांमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन करियर कौन्सिलिंगचे कार्यक्रम घेतले. सीए बी. बी. चंदरगी, प्रवीण घाडी, वाली, अशोक मेणशी, शिवकुमार खडबडी, सचिन खडबडी व सौमित्र जठार या सीए मंडळींनी हे विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच त्यांना कर्मचारी मारुती, अर्चना, लक्ष्मी आणि अमृता यांनी मदत केली असे सांगून सतीश मेहता यांच्यासमवेत बेळगाव शाखेचे सचिव एम. एस. तिगडी, कार्यकारी समितीचे सदस्य राहुल अडके, जयकुमार पाटील, नितीन निंबाळकर या कार्यकारिणी सदस्यांच्या प्रयत्नांमुळे बेळगाव शाखेला हा पुरस्कार मिळाला, असे सतीश मेहता यांनी सांगितले.