ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. देशात मागील 24 तासात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच 52 हजार 123 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 775 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 15 लाख 83 हजार 792 वर पोहचली असून, मृतांची संख्या 34 हजार 968 एवढी आहे.
- आतापर्यंत 10 लाख रुग्ण कोरोनामुक्त!
सध्या देशात 5 लाख 28 हजार 242 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 10 लाख 20 हजार 582रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत देशात 1 कोटी 83 लाख 90 हजार 382 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 4 लाख 46 हजार 662 रुग्णांची बुधवारी एका दिवसात तपासण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात आतापर्यंत 4 लाख 651 रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूत 2 लाख 34 हजार 114, दिल्ली 1 लाख 33 हजार 310, गुजरातमध्ये 59 हजार 126, मध्यप्रदेश 30 हजार 134, आंध्र प्रदेश 1 लाख 20 हजार 390, बिहार 46 हजार 080, राजस्थान 38 हजार 964, उत्तरप्रदेश 77 हजार 334 तर पश्चिम बंगालमध्ये 65 हजार 258 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.