ऑनलाईन टीम / अहमदनगर :
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. मात्र, राज्यातून कोरोना संबंधित एक चिंताजनक आकडा समोर आला आहे. महाराष्ट्रातील सिव्हिल सर्जन सुनील पोखरण यांच्या मते, राज्यातील 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपट्याने वाढत आहे.
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात महाराष्ट्रातील 9,928 मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर याआधी एप्रिल महिन्यात 7,760 मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. डॉक्टरांच्या मते, मुलांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे कारण एकूण संसर्गाच्या दरात वाढ झाली आहे.
पुढे ते म्हणाले, आतापर्यंत मुलांमध्ये कोणताही गंभीर केस समोर आली नाही आहे. नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लहान मुलांमधील कोरोनाची स्थिती याबाबत आढावा घेवून जिल्हा प्रशासनाला सूचना देत या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी रणनीती आखण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय राज्य सरकारने अहमदाबाद जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत की, लहान मुलांसाठी पहिल्यापासूनच वॉर्ड तयार करावेत आणि आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून ठेवावा, असे सांगितले आहे.