ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 4,092 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 40 जणांचा मृतृ झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 20 लाख 64 हजार 278 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 51 हजार 529 एवढा आहे.
कालच्या एका दिवसात 1,355 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 19 लाख 75 हजार 603 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 35 हजार 965 रुग्ण उपचार घेत आहेत.
- मुंबईत 645 नवे रुग्ण, 309 जणांना डिस्चार्ज
मुंबईत कालच्या दिवसात 645 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 4 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच 309 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,14,076 वर पोहचली आहे. तर 2,96,195 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 11,417 इतकी आहे. सद्य स्थितीत 5 हजार 608 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.