ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत तर चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. मागील चोवीस तासात दिल्लीत हजार पेक्षा अधिक रुग्ण वाढले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत गुरुवारी एका दिवसात 1024 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दिल्लीतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 16 हजार 281 वर पोहचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 7495 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दिल्लीत सध्या 8470 रुग्ण ॲक्टिव आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत 316 लोकांनी आपला जीव गमावला आहे.
दरम्यान, 8470 ॲक्टिव्ह रुग्णांपैकी 197 रुग्ण हे आयसीयूमध्ये आहेत. तर 31 जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्याच बरोबर 4227 रुग्ण हे होम क्वारंटाईन आहेत.
तसेच दिल्ली सरकारने आता पर्यंत 1 लाख 91 हजार 977 टेस्ट केल्या आहेत. तर ज्या क्षेत्रात कोरोनाचे अधिक रुग्ण आढळणाऱ्या ठिकाणांना कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. सध्या दिल्लीत कंटेनमेंट झोनची संख्या 100 वर पोहोचली आहे.