प्रतिनिधी/ बेळगाव
चिकोडीरोड ते रायबाग रेल्वेस्थानक या 13 कि. मी. रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे मंगळवार दि. 24 रोजी सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. सध्या लोंढा ते मिरज या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. मोटार ट्रॉली इनिस्पेक्शन ऑफ कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी यांच्याकडून सकाळी 9.30 ते 12.30 या वेळेत पाहणी करण्यात येणार आहे.
ताशी 130 कि. मी. या वेगाने या मार्गाचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. नैर्त्रुत्य रेल्वेने लॉकडाऊनच्या काळात रेल्वे मार्गाच्या देखभालीचे काम पूर्ण केले आहे. या दुपदरीकरणाच्या कामामुळे रेल्वेची गती वाढणार असून, प्रवाशांचा रेल्वे प्रवास अधिक सुखद होणार आहे. त्यामुळे दुपदरीकरणाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी रेल्वे विभागाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे.