अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची विधेयकावर स्वाक्षरी
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी कपंन्यांना अमेरिकेच्या स्टॉक एक्सचेंजमधून बाहेर काढणाऱया कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. ट्रम्प यांनी ‘द होल्डिंग फॉरेन कंपनी अकौंटेबल ऍक्ट’वर स्वाक्षरी केली आहे. सलग तीन वर्षांपर्यंत अमेरिकन पब्लिक अकौंटिंग ओवरसाइट बोर्डाच्या लेखापरीक्षणाच्या नियमांचे पालन न करणाऱया कंपन्या कुठल्याही एक्सचेंजमध्ये नोंदणीकृत होऊ शकत नसल्याचे कायद्यात नमूद आहे. अमेरिकेत नोंदणीकृत अलीबाबा, पिनडय़ुओडय़ुओ ही तंत्रज्ञान कंपनी आणि दिग्गज ऑइल कंपनी पेट्रोचायनाला बाहेर काढणे हाच या कायद्याचा उद्देश आहे. हे विधेयक काँग्रेसमध्ये मोठय़ा बहुमतासह संमत झाला होता.