अँटीबॉडी तयार करण्यास सक्षम : लँसेट
कोरोना महामारीला तोंड देण्यासाठी चीनची लस एका नव्या अध्ययनात सुरक्षित आढळून आली आहे. 18-80 वयोगटातील लोकांवर करण्यात आलेल्या परीक्षणात चिनी लसीचा चांगला परिणाम दिसून आला आहे. लसच्या मदतीने अँटीबॉडी निर्माण झाली आहे. लँसेटमध्ये प्रकाशित अहवालात हा दावा करण्यात आला आहे.
बीबीआयबीपी-सीओआरवी या लसद्वारे कोरोना विषाणू पूर्णपणे निष्क्रीय केला जाऊ शकतो. ही लस अँटीबॉडी निर्माण करण्यासही सक्षम आहे. लसीच्या चाचणीत 18 ते 80 वयोगटातील लोक सामील होते आणि सर्वांमध्ये अँटीबॉडी तयार झाली आहे. अँटीबॉडी निर्मितीचा वेग 18 ते 59 वयोगटातील लोकांमध्ये 60 पेक्षा अधिक वयाच्या लोकांच्या तुलनेत अधिक राहिला आहे. 60 पेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये अँटीबॉडी तयार होण्यास 42 दिवस लागले आहेत. 18-59 वयोगटातील स्वयंसेवकांमध्ये 28 दिवसांमध्ये अँटीबॉडी विकसित झाली आहे.