चिपळूण
मुंबई-गोवा महामार्गावरील डीबीजे महाविद्यालयासमोरील पॅनॉन शोरुम फोडून महागडय़ा पॅमेरासह लेन्स असा लाखोंचा ऐवज चोरुन नेल्याची घटना रविवारी घडली. चोरटय़ांनी शोरुमचे मागील शटर फोडून आत प्रवेश करत हा ऐवज लंपास केला आहे. लॉकडाऊन काळातील शहरातील ही पहिलीच मोठी चोरी आहे.
अरुण कदम यांच्या मालकीचे हे पॅनॉन शोरुम आहे. त्यात पॅनॉन कंपनीचे महागडे पॅमेरे व लेन्सची विक्री केली जाते. कदम हे शनिवारी नेहमीप्रमाणे शोरुम बंद करून घरी गेले. त्यानंतर रात्रीच्या सुमारास चोरटय़ांनी हे शोरुम समोरुन न फोडता शोरुमचे मागचे शटर फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्याने सुमारे 3 लाखो रूपयांचे महागडे पॅमेरे व लेन्स लंपास केले. तसेच या चोरीदरम्यान चोरटय़ाने सीसीटीव्ही पॅमेराच्या केबलही काढल्या होत्या.
रविवारी सकाळी शोरुम उघडल्यानंतर कदम यांना हा चोरीचा प्रकार समजला. यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, पोलीस उपनिरीक्षक समेद बेग यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. यावेळी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. कोरोना पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे शहरातील सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत उघडली जातात. त्यानंतर दुकाने बंद होत असल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरतो. या संधीचा फायदा घेत चोरटय़ांनी हे शोरुम फोडले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
चोरटय़ांना लवकरच शोधून काढणार: ढवळे
पॅनॉन शोरुममध्ये झालेल्या चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनस्थळाची पाहणी केली. यामध्ये माहितगार चोरटय़ानेच ही चोरी केली असल्याचा अंदाज आहे. चोरटय़ापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी जोरदार तपास सुरु केला असून चोरटय़ाला लवकरच शोधून काढून जेरबंद केले जाईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.