तैवानने विमान पडल्याचा संशय
ऑनलाईन टीम / ताइपे :
चीनचे सुखोई-35 लढाऊ विमान तैवान हद्दीत कोसळले. त्यामधील वैमानिक बचावला असून तैवानने त्याला ताब्यात घेतले आहे. तैवानने हे विमान पाडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, दोन्ही देशांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनचे सुखोई-35 विमान तैवानच्या हद्दीत घुसले होते. ते विमान काही वेळातच कोसळले. तैवानने अमेरिकन बनावटीच्या पेट्रियाट मिसाईल डिफेन्स सिस्टीमचा वापर करून हे विमान पाडल्याचे सांगण्यात येते. मात्र, चीनच्या काही रिपोर्टनुसार हे विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळल्याचे म्हटले आहे.
तैवानने हे विमान पाडले असेल तर चीन आणि तैवानमधील संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे. तैवानने हा हल्ला केल्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने अमेरिकने आपल्या नौदलाला सज्ज राहण्याचा इशारा दिल्याचेही सांगण्यात येते.