ऑनलाईन टीम / बीजिंग :
ब्राझीलमधून चीनमधील शिनझेन शहरात आयात करण्यात आलेल्या चिकन विंग्समध्ये कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत. त्यामुळे देशवासियांनी कोणत्याही प्रकारचे फ्रोझनफूड खाऊ नये, अशा सूचना चीनच्या आरोग्य मंत्रालयाने केल्या आहेत.
ब्राझीलमधील सॅण्टा कार्टारिना शहरामधील अरोरा ऍलिमोन्टोज येथील मांस कारखान्यातून चीनच्या शिनझेन शहरात फ्रोझनफूड आयात करण्यात आले होते. या मांसाच्या चाचणीदरम्यान कोरोनाचे विषाणू आढळून आले. फ्रोझनफूड घेताना नागरिकांनी जास्त काळजी घ्यावी, असे तेथील स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मागील महिन्यात इक्वाडोअरमधून चीनमध्ये आयात करण्यात आलेल्या मासळीच्या पाकिटावरही कोरोनाचे विषाणू आढळून आले होते.