वृत्तसंस्था/ लंडन
प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया चेल्सी फुटबॉल क्लबच्या खरेदीसाठी आता तुर्कीचा करोडोपती मुसीन बेरॅक देखील इच्छुकांच्या मांदियाळीत दाखल झाले आहेत.
चेल्सी फुटबॉल क्लबचे रशियन मालक रोमन अब्रामोव्हिच यांनी बुधवारी या क्लबच्या विक्रीची घोषणा केली. रोमन अब्रामोव्हिच यांच्याकडे मागील 19 वर्षे चेल्सी क्लबचे मालक हक्क राहिले आहेत. या क्लबच्या खरेदीसाठी अनेक कोटय़धीश व्यक्ती इच्छूक आहेत. गेल्या दोन दशकामध्ये चेल्सी फुटबॉल क्लबने विविध 19 प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत. सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे चेल्सी फुटबॉल क्लब विक्री करण्याचा निर्णय अब्रामोव्हिच यांनी घेतला आहे.