समीर वानखेडेंची दिल्लीत होणार तपासणी
प्रतिनिधी/ मुंबई
कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज आणि आर्यन अटक प्रकरणातील एनसीबीचे मुख्य चौकशी अधिकारी विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीतील प्रमुख कार्यालयात त्यांची चौकशी होणार असून या निर्णयामुळे एकच खळबळ उडाली आहे. समीर वानखेडे या चौकशीसाठी दिल्लीत हजर राहणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.
दरम्यान, सोमवारी या प्रकरणात आणखी लक्षवेधी घडामोडी घडल्याने पुन्हा एका चर्चेचा विषय ठरला आहे. तर अभिनेत्री अनन्या पांडे आजच्या चौकशीला अनुपस्थित राहिल्याचे एनसीबीच्या अधिकाऱयांनी सांगितले. प्रभाकर साहिलच्या खुलाश्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक यांनीही जोरदार आरोप करत समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो ट्विट करत आणखीच खळबळ उडवून दिले आहे. दुसरीकडे यावरुन समीर वानखेडे यांनी न्यायालयात धाव घेतली असून मंत्रीपदाचा दबाव वापरुन आपल्या कुटुंबीयांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप सत्र न्यायालयात केला आहे. तर साहिल आणि् मलिक यांचे सर्व आरोप फेटाळून एनसीबीने स्वतंत्र प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. दिवसभर सुरु असलेले दावेप्रतिदावे यामुळे एकूणच या प्रकरणाला कोणते वळण लागणार याची चर्चा सुरु आहे.
खंडणीच्या आरोपानंतर चौकशीचा निर्णय
वानखेडे यांच्यावर यातील एक साक्षीदार प्रभाकर साहिल याने खंडणीच्या आरोपाच्या तक्रारी एनसीबीकडे दाखल झाल्यानंतर विभागाकडून या प्रकरणी चौकशीचे संकेत दिले आहेत. एनसीबीच्या अधिकाऱयांनीच दिल्लीत ही चौकशी होणार असल्याचे म्हटले आहे. वानखेडे दिल्लीला आपली बाजू मांडण्यासाठी जाणार असून एनसीबीच्या व्हिजिलन्स कमिटीकडून त्यांची विचारपूस होणार आहे. एनसीबीच्या महासंचालकांच्या आदेशावरूनच हे चौकशीचे आदेश देण्यात आले असून तीन अधिकाऱयांची दक्षता समिती नेमली असून तीही मुंबईत चौकशीला येणार असल्याचे कळते.
योग्य ती कारवाई होईल ः एनसीबी
कोणत्या अधिकारी किंवा व्यक्तीबाबतची माहिती ही एनसीबीला देता येत नाही. पण एनसीबीकडे काही तक्रारी आल्या आहेत. त्याच आधारावर या प्रकरणात योग्य ती कारवाई होईल अशी माहिती एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली.
मलिकांकडून वानखेडेंचा जुना फोटो ट्विट
दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा जन्मदाखला आणि जातीचे प्रमाणपत्र तसेच त्यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो ट्विट करत मोठा आरोप केला आहे. खोटय़ा जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावरच समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे. तर पहिल्या लग्नाचा फोटो टाकताना ‘पहचान कौन’ असे म्हणत वानखेडेंचे डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी पहिला विवाह झाल्याचा दावा केला आहे. ‘समीर दाऊद वानखेडे- यहाँसे शुरु हुआ फर्जिवाडा’ असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
वानखेडे यांची न्यायालयात धाव
आरोप प्रत्यारोपाच्या फैरींनतर सोमवारी एनसीबीचे झोनल डायरेक्टर व तपास अधिकारी समीर वानखेड यांनी सत्र न्यायालयात जाऊन आपली बाजू मांडली. साहिल आणि मंत्री नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले असून एनसीबीने स्वतंत्र प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केले आहे. आपल्यासह कुटुंबियांना टारगेट केले जात असल्याचा आरोप त्यांनी न्यायालयात केला आहे.
’याप्रकरणाचा पर्दाफाश केल्याने मला लक्ष्य केलं जात आहे. मी माझ्या कारकिर्दीत कधीही चुकीचा वागलो नाही. पण आता माझ्या कुटुंबियांना लक्ष्य केले जात आहे. मी कोणत्याही चौकशीला सामोर जाण्यासाठी तयार आहे, असे समीर वानखेडे यांनी न्यायालयाला सांगितले.
तक्रार झाल्यावर वानखेडेंवर कारवाई ः गृहमंत्री
वानखेडेंविरोधात लाच मागितल्याचा व्हिडीओ प्रसारित करणाऱया पंच प्रभाकर साहिल याला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. तर वानखेडे यांनी लाच मागितल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असे गफहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे आता पेंद्र – राज्य संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
अनन्या पांडे चौकशीला अनुपस्थित
अनन्या पांडे वैयक्तिक कारणांमुळे एनसीबी चौकशीसाठी उपस्थित राहिली नसल्याचे एनसीबीच्या अधिकाऱयांनी सांगितले. तिला सोमवारी सकाळी 11 वाजता हजर राहण्याचे निर्देश दिले होते.
सोमवारी मात्र एक वाजल्यानंतरही चौकशीसाठी ती हजर झाली नव्हती. वानखेडे यांनी खडसावल्याचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या. सोमवारीही ती उपस्थित राहिली नाही. एनसीबीने शुक्रवारी तिची साडेतीन तास, गुरुवारी दोन तास तर शनिवारी दोन तास चौकशी केली होती. आर्यनच्या चॅटमध्ये तिचे नाव आल्यानंतर चौकशीस बोलावले. परंतु पहिल्यांदा तिने सर्व आरोप नाकारले. मात्र शनिवारच्या चौकशीमध्ये तिने गांजा उपलब्ध करुन देण्याबाबत आर्यनला मदत केल्याचे सांगितले होते.