खानापूर ः खानापूर येथील श्री चौराशी देवी मल्टिपर्पज वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन डॉ. डी. ई. नाडगौडा होते.
सभेच्या सुरुवातीला मल्टिपर्पज सोसायटीचे मॅनेजर रुझाय फर्नांडिस यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सोसायटीचे माजी चेअरमन एस. एस. कोलकार यांनी वार्षिक अहवाल सादर केला.
यावेळी सोसायटीचे चेअरमन डॉ. डी. ई. नाडगौडा म्हणाले, अल्पावधीतच सोसायटीने उत्तम प्रगती साधली आहे. सोसायटीने आर्थिक वर्षात चांगली उलाढाल करून बऱयापैकी नफा मिळवला आहे. सोसायटीच्या ठेवीदार, कर्जदार व भागधारकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यातच संचालक मंडळाचे चांगले सहकार्य लाभल्यामुळे सोसायटी प्रगतीपथावर आहे.
यावेळी सोसायटीचे व्हा. चेअरमन शिवाजी देसूरकर, संचालक एस. एस. कोलकार, डी. जी. पाटील, विश्वास देसाई, यल्लाप्पा गावडे, कृष्णा शिवणगेकर, मारुती पाखरे, संचालिका गीता देसाई, पूनम कदम आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सोसायटीचे सल्लागार राजू पाटील यांनी केले. संचालक मारुती पाखरे यांनी आभार मानले.
बैठकीला अनेक भागधारक, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सोसायटीचे चेअरमन डॉ. डी. ई. नाडगौडा यांचा सत्कार माजी चेअरमन एस. एस. कोलकार यांनी केला. व्हा. चेअरमन शिवाजी देसूरकर यांचा सत्कार संचालक डी. जी. पाटील यांनी केला. माजी चेअरमन एस .एस. कोलकार यांचाही सत्कार केला.