जगात हिंडण्यासाठी अनके ठिकाणे आहेत, पण सर्वात पसंतीचे ठिकाण निसर्गाच्या सान्निध्यातील शांतताप्रिय स्थळ असते. याचमुळे लोक उत्तम हॉटेल्सची निवड करत असतात. जगात असे एक हॉटेल आहे, जेथे छत तसेच भिंती देखील नाही. तरीही ते पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण ठरले आहे.
या हॉटेलचे नाव ‘नल स्टर्न’ आहे. ते स्वीत्झर्लंडच्या स्विस आल्प्स पर्वतावर असून दांपत्याच्या पसंतीचे हॉटेल आहे. हे एक ओपन एअर हॉटेल असून यात केवळ एकच खोली उपलब्ध आहे. या हॉटेलात वास्तव्य करणाऱया लोकांना उघडय़ावरच झोपावे लागते. नल स्टर्न हे हॉटेल जुलै 2016 मध्ये एका बेडसह सुरू करण्यात आले होते.
समुद्रसपाटीपासून 6,463 फुटांच्या उंचीवर असलेल्या या हॉटेलमध्ये एका रात्रीच्या वास्तव्यासाठी 17 रुपये खर्च करावे लागतात. पण याकरता तेथील हवामान चांगले असणे आवश्यक आहे. योग्य हवामान नसल्यास बुकिंग रद्द केले जाते. कलाकार प्रँक आणि रिकलिन यांनी हे हॉटेल निर्माण केले आहे.
या हॉटेलमध्ये तुम्हाला छत दिसणार नाही तसेच भिंती, रिसेप्शन आणि बाथरुमही दिसून येणार नाही. केवळ हॉटेलमध्ये उपलब्ध होईल ते खुल्या आकाशाखाली असलेला बेड. येथे टॉयलेट देखील नाही. पर्यटकांना येथून 5 मिनिटांच्या अंतरावर असलेला पब्लिक टॉयलेट वापरावा लागतो.
चहुबाजूने पर्वतांनी घेरलेले हे स्थान अत्यंत सुंदर आहे. येथे येणाऱया पर्यटकांना पूर्वीच बुकिंग करावे लागते. कोरोनामुळे सध्या या हॉटेलचे बुकिंग बंद आहे. पुढील वर्षीच हे हॉटेल पुन्हा पर्यटकांसाठी खुले होणार असल्याचे समजते.