ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात आतापर्यंत 3 कोटी 60 लाख 41 हजार 783 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 10 लाख 54 हजार 604 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
मंगळवारी जगभरात 3 लाख 11 हजार 613 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 5553 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 3.60 लाख बाधितांपैकी 2 कोटी 71 लाख 45 हजार 526 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 78 लाख 41 हजार 663 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 67 हजार 821 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 77 लाख 22 हजार 746 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 49 लाख 35 हजार 545 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 लाख 15 हजार 822 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात आतापर्यंत 67 लाख 54 हजार 179 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 57 लाख 41 हजार 253 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 04 हजार 591 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.