ऑनलाईन टीम / शिमला :
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर तीन दिवसांसाठी क्वारंटाइन झाले आहेत. त्यामुळे 9 ऑक्टोबर रोजी आयोजित बैठक रद्द करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयराम ठाकूर यांची उद्या म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी कोरोना टेस्ट केली जाणार आहे. बंजारचे आमदार सुरेश शौरी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या संपर्कात आल्याने मुख्यमंत्र्यांनी स्वतः ला क्वारंटाइन करुन घेतले आहे.
तीन दिवस ते आरोग्य विभागाच्या देखरेखीमध्ये असणार आहेत. त्यामुळे आयोजित बैठक रद्द करण्यात आली आहे. बैठकीची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. ही बैठक महत्त्वाची असून या बैठकीमध्ये बाहेरील राज्यात बस सेवा सुरू करणे, शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.