ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या साडेचार कोटींवर पोहचली आहे. जगात आतापर्यंत 4 कोटी 53 लाख 60 हजार 582 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 11 लाख 86 हजार 609 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
गुरुवारी जगभरात 5 लाख 45 हजार 945 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 7172 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 4.53 लाख बाधितांपैकी 3 कोटी 30 लाख 03 हजार 694 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 1 कोटी 11 लाख 70 हजार 279 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 82 हजार 270 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 92 लाख 12 हजार 767 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 59 लाख 83 हजार 345 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 लाख 34 हजार 177 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात आतापर्यंत 80 लाख 88 हजार 851 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 73 लाख 73 हजार 375 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 21 हजार 131 जणांचा मृत्यू झाला आहे.