ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात 6 कोटी 13 लाख 02 हजार 037 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यामधील 14 लाख 37 हजार 635 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 4 कोटी 23 लाख 93 हजार 123 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 1 कोटी 74 लाख 71 हजार 279 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 1 लाख 04 हजार 903 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
कोरोना रुग्णवाढ आणि मृतांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत 1 कोटी 32 लाख 48 हजार 676 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 2 लाख 69 हजार 555 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर भारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. भारतात 93 लाख 09 हजार 871 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, 1 लाख 35 हजार 752 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाबळींच्या संख्येत ब्राझीलचा जगात दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये 62 लाख 04 हजार 570 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 1 लाख 71 हजार 497 रुग्ण दगावले आहेत.