67 हजारांची अवैध दारु जप्त -विविध 18 ठिकाणी कारवाई
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी चार्ज स्वीकारल्यापासून जिल्हय़ात अवैध दारु, मटका, जुगार यांच्यावर कारवाईचा धडाका सुरु असून यातून वाळूमाफिया देखील सुटलेले नाहीत. दि. 25 रोजी जिल्हय़ात विविध 18 ठिकाणी पोलिसांनी अवैध दारु व्यवसाय करणाऱयांवर छापे टाकत 19 जणांवर कारवाई केली असून त्यांच्या ताब्यातील 67 हजार 157 रुपये किंमतीची अवैध दारु जप्त केली आहे. यामध्ये सातारा व शिरवळ येथे दोन मोठय़ा कारवाया आहेत.
सातारा येथील कृष्णानगर ते प्रतापसिंहनगर रस्त्यावर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी छापा टाकत भारत गंगाराम कांबळे (वय 45, रा. प्रतापसिंहनगर) याच्यावर कारवाई केली. त्याच्या ताब्यातील 21 हजार 248 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
खंडाळय़ात अहिल्यादेवी चौक, मातंगवस्ती व शिवाजीनगर, भोसले वस्ती येथे खंडाळा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी छापा टाकत आकाश अभिनव वाघमारे (रा. खंडाळा) व छाया बाळू चव्हाण (वय 50 रा. भोसलेवस्ती) यांच्यावर कारवाई केली. त्यांच्या ताब्यातील 1 हजार 520 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
पुसेगाव (ता. खटाव) येथे दहिवडी रस्त्याला सम्राट ढाब्याच्या आडोशाने सुरु असलेल्या अवैध दारु विक्रीवर छापा टाकत पोलिसांनी राहूल शहाजी गायकवाड (वय 25 रा. पुसेगाव, ता. खटाव) याच्यावर कारवाई करत त्याच्या ताब्यातील 936 देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहे. सातारा तालुका पोलिसांनी शिवथर (ता. सातारा) येथील बौध्द वस्तीकडील रस्त्यावर अश्वजित विवेक कांबळे (वय 24) व दयानंद सुभाष माने (वय 24 रा. शिवथर) यांच्यावर कारवाई त्यांच्या ताब्यातील 1 हजार 820 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या.
फलटण ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत आसू गावच्या हद्दीत वाघू नाना भोसले (रा. आसू) व जिंती येथे भानुदास बापू रणवरे (वय 55 रा. जिंती व विडणी (ता. फलटण) येथे सुशील सुरेश जगताप यांच्यावर कारवाई करत त्यांच्या ताब्यातील 1600 रुपयांची हातभट्टी दारु व देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. कराड तालुका पोलिसांनी साकुर्डीत टाकलेल्या छाप्यात दत्तात्रय गोपाळकृष्ण कुलकर्णी (रा. वडगाव हवेली, ता. कराड) याच्यावर कारवाई करत त्याच्या ताब्यातील 728 रुपयांची देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
वाई तालुका पोलिसांनी ओझर्डे (ता. वाई) येथे टाकलेल्या छाप्यात राजेंद्र शंकर जाधव (वय 59 रा. ओझर्डे) याच्यावर कारवाई करत त्याच्या ताब्यातील 988 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या. तर कराड शहर पोलिसांनी गोळेश्वर, (ता. कराड) येथे टाकलेल्या छाप्यात सत्यवान आनंदा आडके (वय 34) याच्यावर कारवाई करत त्याच्या ताब्यातील 1 हजार 248 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
बोरगाव (ता. सातारा) पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी वेणेगाव येथे दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात विकास सदाशिव सावंत (वय 42 रा. वेणेगाव) व हजरफ हनिफ सुतार (वय 38 रा. सासपडे) यांच्यावर कारवाई केली. त्यांच्या ताब्यातील 1600 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. लोणंद पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी टाकलेल्या छाप्यात राजेश पंजाब नवले (रा. पाडेगाव) व अनिता बाळू गंगावणे (रा. कापडगाव, ता. फलटण) यांच्यावर कारवाई करत 1200 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
शिरवळ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी लोणंद रस्त्यावर टाकलेल्या छाप्यात विशाल उर्फ बाबू महादेव चव्हाण (वय 27) याच्यावर कारवाईत त्याच्या ताब्यातील 29 हजार 992 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. तर वडगाव पोतनिस (ता. खंडाळा) येथे टाकलेल्या छाप्यात संदीप मदन कुंभार (वय 32) याच्यावर कारवाईत त्याच्या ताब्यातील 3 हजार 500 रुपयांची हातभट्टी दारु जप्त केली आहे. वडूज पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी तडवळे, ता. खटाव येथे टाकलेल्या छाप्यात सुरेखा सूर्यकांत पवार (रा. तडवळे) हिच्यावर कारवाई करत तिच्या ताब्यातील 624 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.