ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात मागील 24 तासात 4 लाख 90 हजार 059 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 6531 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4 कोटी 24 लाख 90 हजार 278 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 11 लाख 49 हजार 237 एवढा आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
4.24 कोटी बाधितांपैकी 3 कोटी 14 लाख 27 हजार 585 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 99 लाख 13 हजार 456 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 76 हजार 534 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 87 लाख 46 हजार 953 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 56 लाख 98 हजार 161 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 लाख 29 हजार 284 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात आतापर्यंत 78 लाख 14 हजार 682 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 70 लाख 16 हजार 046 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 17 हजार 992 जणांचा मृत्यू झाला आहे.