माणसांची हत्या करण्याचा छंद
जगातील अनेक समुदाय स्वतःच्या परंपरा, राहणीमान आणि आहारावरून चर्चेत असतात. जगातील अनेक आदिवासी समुदाय आज देखील हजारो वर्षे जुन्या परंपरांचे पालन करतात. हे समुदाय ज्या जंगलांमध्ये राहतात, त्यावर त्यांचा पूर्ण अधिकार असतो. तेथील सरकार देखील या समुदायांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करत नाही. जगातील काही आदिवासी समुदाय अत्यंत धोकादायक असतात. याचपैकी एक इथियोपियातील क्रूर मुर्सी समुदाय आहे.
इथियोपियातील क्रूर मुर्सी समुदायाच्या लोकांसाठी कुणाची हत्या करणे हे पौरुषत्वाचे लक्षण आहे. हा समुदाय दक्षिण इथियोपिया आणि सूदान सीमेवरील ओमान खोऱयात राहतो. या लोकांकडे असलेल्या अस्त्रांद्वारे कुणाचाही क्षणार्धात जीव घेता येणे शक्य आहे. याचमुळे या समुदायाला सर्वात धोकादायक मानले जाते.
अजब परंपरा
मुर्सी समुदाय स्वतःच्या अजब प्रथापरंपरांसाठी जगभरात ओळखला जातो. या समुदायाच्या महिलाच्या खालच्या बाजूला ओठात बॉडी मॉडिफिकेशन प्रक्रियेत लाकडी किंवा मातीची डिस्क बसविण्यात येते. या महिलांना वाईट नजरांपासून वाचविण्याच्या उद्देशाने असे करण्यात येते. यामुळे महिलांचे सौंदर्य कमी होत त्या कमी आकर्षक दिसू लागत असल्याचे समुदायाचे मानणे आहे.
हत्येशिवाय जगण्यात नाही अर्थ
मुर्सी समुदायाची लोकसंख्या सुमारे 10 हजार इतकी आहे. ‘कुणाला न मारता जिवंत राहण्याला कुठलाच अर्थ नाही आणि याहून स्वतः मरून जाणे उत्तम’ असे या समुदायाच्या लोकांचे मानणे आहे. मुर्सी समुदायाच्या लोकांनी शेकडो जणांचा जीव घेतला आहे. जर कुणी अनुमतीशिवाय त्यांच्या क्षेत्रात शिरल्यास त्याचा मृत्यू अटळ असल्याचे बोलले जाते.
संपर्क साधण्यास मनाई
या समुदायाच्या हिंसक वर्तनामुळे इथियोपियाच्या सरकारने त्यांच्याशी संपर्क साधण्यावर बंदी घातली आहे. जर एखादा विदेशी राष्ट्रप्रमुख अतिथी म्हणून इथियोपियात आल्यास आणि त्याने मूर्सी समुदायाला पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यास सरकार सशस्त्र सुरक्षारक्षकांसमवेत त्याचा आदिवासी क्षेत्राचा दौरा घडवून आणते.