पोस्ट तिकिटाच्या आकाराचा गेम कंसोल
स्क्रीन, प्ले बटनसह चार्जिंगसाठी मायक्रो युएसबी पोर्ट
अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी ज्गातील सर्वात छोटा गेम कंसोल तयार केला आहे. हा पोस्ट तिकिटाच्या आकाराचा असला तरीही काम पूर्ण आकाराच्या कंसोलप्रमाणे करतो. ओहियोतील कंपनी टाइनी सर्किट्सने हा विकसित केला असून यात 5 गेम्स प्री-इन्स्टॉल्ड मिळतील.
याच्या बेसिक ग्रे मॉडेलची किंमत 1,425 रुपये आहे. लिंक केबल आणि अन्य असेसरीजसोबत याची किंमत वाढू शकते असे कंपनीने म्हटले आहे. गेम कंसोलमध्ये ओएलईडी स्क्रीन डिस्प्ले आहे. कंसोलमध्ये बॅटरीसोबत बजर, गेम प्ले बटन, पॉवर स्विच, स्क्रीन आणि तो चार्ज करण्यासाठी मायक्रो-युएसबी पोर्ट देखील देण्यात आला आहे. युजर याच्या सॉफ्टवेअरला अपडेट करू शकणार आहे. यात की-रिंग अटॅच करण्यासाठीही जागा देण्यात आली आहे.
कंसोलमध्ये टेट्रीज, स्पेस इनव्हेडर्स आणि स्नॅक यासारखे गेम्स पूर्वीच इन्स्टॉल्ड मिळतील. याचबरोबर युजर मायक्रोपायथन लँग्वेजचा वापर करून स्वतःसाठी मल्टीप्लेयर गेम्स तयार करू शकतील.
छोटे व्हर्जन तयार करण्यासाठी प्रसिद्ध
कंसोल तयार करणारी कंपनी टाइनी सर्किट्स इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचे छोटे व्हर्जन तयार करण्यासाठी ओळखली जाते. कंपनीने 2012 मध्ये स्वतःचे पहिले उत्पादन टाइनी डय़ूइनो सादर केला होता. याचबरोबर कंपनीने टीव्ही. आर्केड कंसोल आणि व्हॉयलिन देखील सादर केले आहे.