जगात अनेक अजब गोष्टी असून त्याबद्दल जाणून घेतल्यावर लोक अवाप् होतात. अशीच एक जगातील सर्वात लांबीची कार आहे. ‘द अमेरिकन ड्रीम’ या नावाने प्रसिद्ध लिमोझीन कारला जगातील सर्वाधिक लांबीची कार असण्याचा गौरव प्राप्त आहे. या कारने 1986 मध्ये स्वतःचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविले होते. या कारची लांबी 100 फूट आहे. म्हणजेच ही कार सुमारे 10 मजली इमारतीइतकी लांब आहे.
ही कार कुठल्या कंपनीने नव्हे तर चित्रपटासाठी गाडय़ांचे प्रख्यात डिझायनर जे ओरबर्ग यांनी याचे डिझाइन केले होते. कॅलिफोर्नियात राहणाऱया ओरबर्ग यांना कार्सचा मोठा छंद होता. त्यांनी अनेक कार्सच्या आकर्षक डिझाइन्स तयार केल्या आहेत.
कारची वैशिष्टय़े…
100 फूट लांबीच्या या लिमोझीनमध्ये 26 टायर्स होते आणि ती दोन्ही बाजूंनी ड्राइव्ह करता येत होती. 1976 च्या कॅडिलॅक इल्डोराडो लिमोसिनेसवर ही कार आधारित होती. डिझाइनरने या कारला 1980 च्या दशकात डिझाइन केले होते. त्यांचे हे डिझाइन 1992 मध्ये सत्यात उतरले. कारच्या पुढे आणि मागील बाजूस व्ही8 इंजिन बसविण्यात आले होते. एवढेच नाही तर कार मधून वळू देखील शकत होती. या कारमध्ये स्वीमिंग पूल, जकूजी, बाथ टब, छोटे गोल्फ कोर्स, अनेक टीव्ही, फ्रीज आणि टेलिफोन होता. पण सर्वात विशेष बाब म्हणजे यावर एक हेलिपॅड देखील तयार करण्यात आले होते. कारमधून 70 लोक प्रवास करू शकत होते.
सुरू झाली कारची दुरुस्ती
या कारची निर्मिती चित्रपटांमध्ये वापर करण्याच्या दृष्टीनेच करण्यात आली होती. 14 हजार प्रतितास या दराने ही कार भाडय़ाने दिली जात होती. पण हळूहळू या कारच्या देखभालीकडे दुर्लक्ष होऊ लागले. कारला पार्किंगसाठी मोठी जागा आवश्यक होती. चित्रपटांमध्ये देखील अशा कार्सची मागणी कमी झल्याने ती बाजूला पडली होती. कार संग्रहालयाने ही कार खरेदी केली होती. आता या कारच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.