वृत्त संस्था/ बार्सिलोना (स्पेन)
ब्राझीलचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू डॅनी अल्वेसला शुक्रवारी एफसी बार्सिलोना फुटबॉल क्लबने करारबद्ध केले. या फुटबॉल हंगामातील उर्वरित कालावधीसाठी बार्सिलोना क्लबने हा करार केला. अल्वेसने बार्सिलोना क्लबचे प्रतिनिधित्व करण्याची ही दुसरी वेळ असेल.
पुढील आठवडय़ापासून सुरू होणाऱया बार्सिलोना फुटबॉल क्लबच्या सराव शिबिरात अल्वेस दाखल होणार आहे पण, तो जानेवारीअखेरपर्यंत खेळू शकणार नाही. बार्सिलोना संघाला नवे प्रशिक्षक झेव्ही हर्नांडेझ प्रमुख प्रशिक्षक लाभले आहेत.
2008 च्या उन्हाळी फुटबॉल हंगामात डॅनी अल्वेस बार्सिलोना संघामध्ये दाखल झाला होता. यानंतर तो पुढील पाच फुटबॉल हंगामात सेव्हीला क्लबकडून खेळला. ब्राझीलच्या अल्वेसने आपल्या कारकीर्दीत बार्सिलोना संघाकडून 391 सामन्यांत 23 गोल नोंदविले आहेत. ब्राझीलचे प्रतिनिधीत्व करणाऱया अल्वेसने आपल्या दर्जेदार खेळाच्या जोरावर ब्राझील संघाला 6 प्रमुख स्पर्धा जिंकून दिल्या असून त्यामध्ये टोकियो ऑलिम्पिकचा समावेश आहे. एफसी बार्सिलोना संघाचे प्रतिनिधीत्व करताना अल्वेसने 23 विजेतेपदे मिळविली. तसेच युवेंट्स संघाकडून खेळताना दोन, पॅरिस सेंट जर्मन (पीएसजी) सहा, साओ पावलोकडून एक अशी विजेतेपदे मिळविली आहेत.