प्रतिनिधी / सांगली
उपयोगकर्ता कर रद्द करावा. विक्रेत्यांचे रखडलेले परवाने तात्काळ द्यावेत या मागणीसाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आणि जनसेवा भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष शंभोराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली भाजी विक्रेत्यांनी महापालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपयोगकर्ताची एडव्हान्स वसुली, दुप्पट भुईभाडे याला आमचा विरोध आहे. विनाअट, विनाकर लायसन्स द्यावेत एक वर्षापासून आमचे लायसन्स तयार आहेत ते आज द्यावेच लागतील. अशी मागणी करण्यात आली.
महापुरापासून कोरोना पर्यंत दोन आपत्ती काळात प्रशासनाने केलेल्या कारभाराचा हिशोब दिलेली नाही. महापालिकेचा कारभार अत्यंत बेदरकारपणे चालवून शहराच्या हिताला बाधा पोहोचवली आहे. महापालिकेच्या आणि विना नंबरच्या भूखंडांचा वापर सार्वजनिक हितासाठी होण्याऐवजी खाजगी व्यक्तींच्या घशात अशा जमिनी घालण्यासाठी बांधकाम परवाने देण्यात आले आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला.