ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये मागील 24 तासात 338 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 63 हजार 378 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल 535 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत एकूण 1,63,378 रुग्णांपैकी 1 लाख 52 हजार 758 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 212 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 36 लाख 87 हजार 114 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 5 हजार 408 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 113 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 15 जण व्हेंटिलेटरवर आहेत.