सुरत / वृत्तसंस्था
गुजरातमधील न्यायालयाने एका 27 वषीय तरुणाला नुकतीच बलात्काराचा आरोप सिद्ध झाल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायमूर्तींची निकाल वाचनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही क्षणातच संबंधित आरोपीने भर न्यायालयात न्यायमूर्तींच्या दिशेने चप्पलफेक केली. सुरत जिल्हा न्यायालयात हा प्रकार घडला आहे. सुजित साकेत असे जन्मठेप सुनावलेल्या आरोपीचे नाव असून त्याने गेल्यावषी एप्रिल महिन्यात एका स्थलांतरित मजूर असणाऱया कुटुंबातील पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करत तिची हत्या केली होती. जन्मठेपेच्या शिक्षेमुळे आता आपल्याला आयुष्यभर कारागृहातच दिवस घालवावे लागणार या विचाराने बिथरलेल्या आरोपीने केलेल्या चप्पलफेकीच्या प्रकारानंतर न्यायालयात गोंधळ निर्माण झाला. न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याबरोबरच पीडित मुलीच्या कुटुंबाला नुकसान भरपाई म्हणून 20 लाख रुपये देण्याचे आदेशही दिले आहेत.