मुलांच्या भांडणांमध्ये मोठय़ाचा हस्तक्षेप नाही, मिमामोरू तंत्रज्ञान अन्य देशांसाठीही उपयुक्त
शाळेत मुलांना भांडण किंवा वादावादी करत असताना पाहिल्यास शिक्षक त्यांच्यात हस्तक्षेप करतात. जगभरात मुलांना सांभाळण्यासाटी हीच पद्धत वापरली जाते. पण जपानच्या शाळांमध्ये अशा प्रकारांपासून दूर राहण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. म्हणजेच मुलांच्या भांडणात मोठे लोक हस्तक्षेप करत नाहीत.
यामुळे मुलांमध्ये स्वायत्तता आणि तोडगा काढण्यासाठी प्रोत्साहित होण्याची संधी मिळत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे अन्य देशांमध्ये भांडणाऱया मुलांना सांभाळण्याची नवी रणनीतिही समोर आली असून याला ‘मिमामोरू’ म्हटले जाते. ‘मिमा’चा अर्थ नजर ठेवणे आणि ‘मोरू’ म्हणजे रक्षण करणे आहे. याला टीचिंग बाय वॉचिंग म्हणूनही समजता येते. एकीकडे मोठे लोक मुलांमध्ये हस्तक्षेप करत नाहीत, जणेकरून असहमतीच्या स्थितीत मुलांना स्वतःची मर्जी आणि निर्णयांद्वारे शिकता यावे.
हिरोशिमा युनिव्हर्सिटीच्या अध्ययनात मुलांची भांडणे सोडविण्याची ही पद्धत उपयुक्त दिसून आली आहे. मुलांच्या लढाईत जपानी लोक का हस्तक्षेप करत नाहीत आणि त्याचे फायदे कोणते हे जाणून घेण्याचा प्रयत्न अध्ययनात करण्यात आला आहे. मुले भांडत असताना गप्प बसून राहणे विचित्र वाटू शकते, पण मिमामोरू अशा भांडणांमधून शिकण्याची मोठी संधी अशा स्वरुपात याच्याकडे पाहते.
मोठय़ा लोकांनी त्वरित हस्तक्षेप केल्यास मुलांकडून शिकण्याची संधी ते हिरावून घेतात. तर मुलांना अशा स्थितीत लेखणे अजाणतेपणी चांगले किंवा वाईट ठरू शकते. या रणनीतिसाठी शिक्षण धोरणात काही बदल करावे लागतील. योग्य पद्धतीने लागू झाल्यास अमेरिकाच नव्हे तर जगभरातील देशांमध्ये हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते असे अमेरिकेच्या शिक्षकांचे म्हणणे आहे.
मुलांची सुरक्षा सर्वोपरि
भांडणानंतर मुलांना असे करायला नको होते असे वाटते. भांडणातून समस्येवर तोडगा निघू शकत नसल्याची जाणीव त्यांना होते असे अध्ययनात दिसून आले आहे. दूर राहण्याचा अर्थ मुलांच्या सुरक्षेकडे डोळेझाक करणे नसल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. पण नुकसानीची जोखीम शिकण्याच्या लाभापेक्षा अधिक असेल तरच हस्तक्षेप करावा.