वैज्ञानिकांना प्रशांत महासागरात एक दुर्लभ पारदर्शक ऑक्टोपस मिळाला आहे. याला ग्लास ऑक्टोपस नाव देण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे या ऑक्टोपसची त्वची पारदर्शक असल्याने त्याचे सर्व अवयव डोळय़ांनी पाहता येतात. हा ऑक्टोपस फीनिक्स बेटानजीक दिसून आला असून वैज्ञानिक भाषे याला विट्रेलेडोनेल्ला रिकार्डी म्हटले जाते.
ऑक्टोपसची ही प्रजाती अत्यंत खोल पाण्यात पोहताना दिसून येतात. ग्लास ऑक्टोपस पाण्यात लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान आढळल्याचे शेमिडिट ओशियन इन्स्टीटय़ूटच्या संचालिका डॉ. ज्योतिका वीरमानी यांनी सांगितले आहे.
ग्लास ऑक्टोपससंबंधी अद्याप कुठलेच मोठे संशोधन झालेले नाही, याचमुळे त्याच्यासंबधी फारशी माहिती ज्ञात नाही. याचे शरीर 45 सेंटीमीटरपर्यंत वाढू शकते. ग्लास ऑक्टोपसचे डोळे चौकोनी आकाराचे असतात आणि अंडय़ांमध्ये त्यांचा भ्रूण विकसित होतो.
डॉ. वीरमानी आणि त्यांची टीम फीनिक्स बेट पाहण्यासाठी बाहेर पडले होते. फीनिक्स बेट जगातील दुसरी सर्वात मोठी कोरल इकोसिस्टीम आहे. येथे वैज्ञानिकांनी कोरलच्या नव्या प्रजाती शोधल्या आहेत. यात गोल्डन कोरल देखील सामील आहे. रोबोटने व्हेल शार्क देखील कॅमेऱयात कैद केला आहे. व्हेल शार्कची लांबी सुमारे 40 फूट इतकी होती.