वार्ताहर/ जमखंडी
बागलकोट जिल्हय़ात रविवार दि. 21 रोजी 14 जणांना कोरोना बाधा झाली असून एकूण बाधित संख्या 131 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. के. राजेंद यांनी दिली. मुधोळ येथे 8, बागलकोट 5 तर जमखंडीत 1 रुग्ण आढळून आले असून यांना बागलकोट जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुधोळ येथे रुग्ण क्रमांक 7547 च्या संपर्कामुळे 6 वर्षाची मुलगी रुग्ण क्रमांक 8701, 36 वर्षाची महिला रुग्ण क्रमांक 8702, 53 वर्षाचा पुरुष रुग्ण क्रमांक 8703, 12 वर्षाची मुलगी रुग्ण क्रमांक 8704, 55 वर्षाची महिला रुग्ण क्रमांक 8705, 56 वर्षाचा पुरुष रुग्ण क्रमांक 8706, 14 वर्षाचा मुलगा रुग्ण क्रमांक 8707, 45 वर्षाची महिला रुग्ण क्रमांक 8708 तर बागलकोट येथील 50 वर्षाची महिला रुग्ण क्रमांक8709, 25 वर्षाची युवती रुग्ण क्रमांक 8711, 58 वर्षाची महिला 8712, 5 वर्षाची मुलगी रुग्ण क्रमांक 8713, 33 वर्षाचा पुरुष रुग्ण क्रमांक 8714, तर जमखंडीतील 36 वर्षाचा पुरुष रुग्ण क्रमांक 8710, असे बाधित असून जमखंडीचा रुग्ण महाराष्ट्र राज्यातून परतला होता. तर बागलकोट येथील रुग्ण क्रमांक 8709 विदेशातून परतली होती. रुग्ण क्रमांक 8714 याला खोकला, सर्दी, ताप असल्याने स्वॅब चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. रविवारी कोविड मुक्त होऊन 6 जण घरी परतले पण 14 जण बाधित झाले असून बाधित 131 तर बरे होऊन परतलेल्यांची संख्या 100 झाली. सध्या 30 रुग्णावर उपचार सुरु आहेत.