25 दिवस फार्महाऊसमध्ये आश्रय देणारा मटका बुकी अडचणीत
प्रतिनिधी/ बेळगाव
शनिवारी खडेबाजार पोलिसांनी सुपारी टोळीतील दोन युवकांना अटक केली आहे. त्यामुळे आता त्यांना आश्रय देणाऱयांचे धाबे दणाणले आहेत. बेळगावातील मटका व जुगारी अड्डे चालविणाऱयांनी या टोळीतील गुन्हेगारांना आसरा दिल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली असून त्यामुळे अनेक जण अडचणीत आले आहेत.
खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी शनिवारी विशालसिंग विजयसिंग चव्हाण (वय 21) मूळचा रा. चिक्कनंदिहळ्ळी, सध्या राहणार शास्त्राrनगर, प्रथमेश नारायण गणिकोप्प (वय 19) रा. शास्त्राrनगर या दोघा जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर भादंवि 387, 506, 109, सहकलम 34 व शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
विशालसिंग चव्हाण गेल्या सहा महिन्यांपासून फरारी होता. कधी बेळगाव तर कधी पुणे असा त्याचा प्रवास असायचा. पोलिसांनी अनेक वेळा त्याला अटक करण्यासाठी यापूर्वीही सापळा रचला होता. मात्र, अत्यंत चलाखीने तो पोलिसांना गुंगारा देत होता. गेल्या सहा महिन्यात त्याला आश्रय देणारे कोण आहेत? याची माहिती मिळविण्यात येत आहे.
1 जानेवारी 2020 रोजी शहापूर येथे झालेल्या खुनी हल्ल्यानंतर विशालसिंग चव्हाण पुण्याला गेला होता. तेथेही त्याने एकावर खुनी हल्ला केला. पुण्यातील डेक्कन पोलीस स्थानकात त्याच्यावर एफआयआर दाखल झाला आहे. सातारा, कराड, हुक्केरी अशा ठिकाणी आश्रय घेत तो पोलिसांना गुंगारा देत होता, अशी माहिती मिळाली आहे.
हुक्केरी येथील महावीर सोलापुरे या युवकाने सुपारी टोळीतील गुन्हेगारांना आश्रय दिला होता. सध्या गोकाक पोलिसांनी महावीरला अटक केली आहे. 23 जानेवारी 2020 रोजी हुलबत्ते कॉलनी येथील मुकेश कामटे या व्यापाऱयाला एक लाख रुपयांच्या खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या महावीर सोलापुरे यालाही पोलीस कोठडीत घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
शहापूर येथील एका मटका बुकीने विशालसिंग चव्हाण तब्बल 25 दिवस एका फार्महाऊसवर आश्रय दिला होता. पुणे, भिवंडी, बेळगावसह अनेक ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती असूनही त्याला आश्रय देण्यात आला आहे. आश्रय देणाऱया मटका बुकीच्या अडचणीही आता वाढल्या आहेत. त्यालाही ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
शहापूर परिसरात जुगारी अड्डा चालविणाऱया एका महाभागाने आपल्या अड्डय़ावर पहारेकरी म्हणून सुपारी गुन्हेगारांचा वापर केल्याची माहिती उघडकीस आली आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी सुरू असून मटका व जुगारी अड्डे चालविणाऱयांनी सुपारी गुन्हेगारांमागे आपली ताकद लावली होती. वसुलीसाठी या गुन्हेगारांचा वापर केला जात होता, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली असून यापैकी काही अड्डे पोलिसांच्या आशीर्वादानेच सुरू आहेत.