वार्ताहर/ जमखंडी
जमखंडी तालुक्यातील 26 ग्राम पंचायतीच्या 416 जागाकरिता निवडणूक होत असून सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी 7 जणांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती तहसीलदार एस. बी. इंगळे यांनी दिली.
तालुक्यातील मरेगद्दी पंचायतीकरिता व कडपट्टी पंचायतीकरिता प्रत्येक दोन उमेदवारांनी तर कन्नोळी, कुचनूर, सिद्दापूर पंचायतीकरिता प्रत्येकी एकाने उमेदवारी अर्ज दाखल केले.