कणकवली भाजपची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी
कणकवली:
जिल्हय़ात जमावबंदी आदेश असतानाही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवार, 17 मार्चला सकाळी दहाच्या सुमारास येथील शिवसेना कार्यालयासमोर बेकायदेशीर जमाव करून आमदार नीतेश राणे यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी व फलकबाजी केली. सेनेच्या कार्यकर्त्यांनी जमावबंदी आदेशाचा भंग करून कायदा, सुव्यवस्था बिघडविण्याचे काम केले आहे. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱयांनी गुरुवारी कणकवली पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्हय़ात 27 मार्चपर्यंत जमावबंदी आदेश लागू आहे. असे असतानाही कन्हैया पारकर, गीतेश कडू, ललीत घाडीगावकर, निसार शेख, उमेश गुरव, प्रतिक रासम, सचिन पवार, किरण वर्दम असे 20-25 कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत होते. त्यांनी मनाई आदेशाचा जाणीवपूर्वक भंग केलेला आहे. तरीही त्यांच्याविरोधात अद्यापही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन सादर करतेवेळी पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्राr, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, युवा मोर्चाचे संदीप मेस्त्राr, नितीन पाडावे, रुपेश कानडे, गणेश तळगावकर, पप्पू पुजारे, सुभाष मालंडकर, सागर राणे, संदेश सावंत, राजवीर पाटील आदी उपस्थित होते.